आमच्याबद्दल

    
Total Views |
Pasaydan-Parisar_1 &
 
पसायदान परिसर हे एक आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थळ म्हणून १२ एकरचे परिसरात "मुंडले एज्युकेशनल ट्र्स्ट " नागपूर द्वारे नागपूर पासून ४० कि . मी . चे अंतरावर बुटीबोरी-बोरखेडी नंतर असलेल्या "वडगाव" धरणाजवळ (रामा डॅम ) हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 
२० फुटाच्या ध्यानमंडपावर असलेली श्री ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मूर्ती , उल्लेखनीय ६ भिंतीचित्र , शिवरायांच्या सामर्थ्याने पुलकित झालेल्या महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय अशा ६ दुर्गप्रतिकृती तसेच छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी पूर्णाकृती शिल्पासह , निसर्गरम्य वातावरणाने हा परिसर व्याप्त आहे. नवयुवक व विध्यार्थ्यासह सर्व आबालवृद्धांना प्रेरित करू शकेल असाच अनुभव येथे आल्यावर लाभेल याची शाश्वती आहे.
 
संकल्पना
सौ. अनुराधा मुंडले
श्री. प्रभाकर मुंडले
 
शिवरायांचे किल्ले
श्री प्रफुल्ल माटेगावंकर
 
 
पसायदान परिसर येथे विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सहल, तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता व अन्य विशेष आयोजनांकरिता संपर्क करा