एक विलोभनीय परिसर..

    
Total Views |

testimonial_1   
 
पसायदान हा शब्द तुम्हाला अनोळखी नसेलच. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानाचा उल्लेख केलेला आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा इथे स्थापली आहे. प्रतिमेच्या खाली ध्यान मंदिर आहे जिथे तुम्ही ध्यान करू शकता. मूर्तीच्या आजूबाजूला छान झाडे लावली आहेत ज्याने तो परिसर अजून विलोभनीय वाटतो.
 
नागपूरच्या माटेगावकर यांनी इथे छान किल्ल्यांच्या छोट्या रचना केलेल्या आहे. प्रतापगड, सिहगड, शिवेनेरी, इत्यादी गडांची प्रतिकृती माहितीसोबत इथे पाहायला तुम्हाला मिळेल. नागपुरला आल्यावर एकदातरी या जागी जरूर भेट द्यावी.
- शाकाल शुक्ला