स्वा. वि. विनायक दामोदर सावरकर

31 Jan 2020 15:07:03
 
Veer-Sawarkar_1 &nbs
 
२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६
वयाच्या 16 व्या वर्षी चापेकर बंधुंच्या बलीदानान पेटलेल्या बाळ सावरकरांनी ‘‘देशाचे स्वातंत्र्य मिळविण्याकरता सशस्त्र क्रांतीचा सेतु उभारुन मी मारता मारता मरेस्तोवर झुंझेन ‘‘अशी शपथ घेतली. मित्र मेळा, अभिनव भारत संघटना हया संस्था उभारुन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा सुवर्ण महोत्सव त्यांनी लंडन येथे साजरा केला. बॅरीस्टरची परिक्षा पास होवुनही त्यांनी ती पदवी नाकारली. कवि सावरकर ही त्यांची ओळख जगमान्य आहेच. काळया पाण्याच्या दोन शिक्षा ठोठावलेला हा एकमात्र क्रांतीवीर. आज आपण सावरकरांची फक्त मार्सेलीसची उडी तेवढी लक्षात ठेवतो पण खरेतर त्यांच्या विचारांचा ठेवा आपण जतन करायला हवा.
 
‘‘अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगति असा कवण जन्मला’’ हा मृत्युंजय मंत्र सार्थ केला.
Powered By Sangraha 9.0