श्री संत ज्ञानेश्वर

    
Total Views |

 
 
इ.स. १२७५ ते १२९६
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या ग्रंथात भगवद्गीतेवर विस्तृत टीका आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील सर्वात प्राचीन मोठा ग्रंथ आहे. प्राकृत जनांना धर्माचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी मुद्दाम
 
‘‘माझा मऱ्हाठाचि बोल कौतुकें ।
परि अमृतातेहि पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन !!
 
अशी प्रतिज्ञा करून ग्रंथ लिहिण्यास प्रांरभ केला आणि
 
दुरितांचे तिमिर जावो ।
विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो ।
प्राणिजात ।।
 
हया आशीर्वादपूर्वक वचनाने ग्रंथाचा शेवट केला. शके बाराशे बारोत्तरी मध्ये म्हणजे इ. स. १२९० मध्ये हा ग्रंथ समाप्त झाला असे ज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले आहे.
 
‘हे विश्वचि माझे घर । ऐसी मति जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।
 
ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी दिलेला हा अमर संदेश आहे. संत नामदेव निर्वाणीने निर्वाळा देतात. ते म्हणतात,
 
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ।
एक तरी ओवी अनुभवावी ।।’