श्री संत तुकाराम

    
Total Views |
तुकारामांचा जन्म देहू गावी एका समृद्ध घराण्यात इ.स. १५९८ मध्ये झाला. त्यांचे आईवडील धार्मिक वृत्तीचे होते. विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. आशाढी- कार्तिकी एकादशीनिमित्य ते नित्यनियमाने पंढरपूरला जात असत.
 

tuka_1  H x W:  
 
तुकारामांचे बालपण व नंतरचा काळ सुखात गेला. तुकाराम महाराजांच्या डोळयात विठ्ठलाचे रूप भरून होते. त्यांना पांडुरंग सर्वत्र दिसत होता.
पांडुरंगाच्या आज्ञेवरून तुकाराम महाराजांनी अभंग रचण्यास प्रारंभ केला.
 
तुकाराम महाराज एकादशीस पंढरपूरला जात असत. पुढे ते आजारी पडले. अशक्त झाले. पंढरपूला जाण्याचे त्यांच्यात अवसान राहिले नाही. तेव्हा त्यांनी वीस अभंगात वारकऱ्यांबरोबर विठोबास पत्र लिहून पाठविले. ‘‘देवा, तुझी स्मृती करताना श्रृतिस्मृती थकल्या. तुझी स्तुती करण्याची माझी शक्ती नाही. मी तुझ्या पायाचा आश्रय केला. तुझ्या नामाच्या उच्चाराने दारिद्रय देषांतरी जाते, सुखसृद्धी लाभते, परंतु माझे संचित खोटे म्हणून माझी ही दशा. रात्रंदिवस तुझे नाम माझ्या तोंडी आहे. तळमळ न करता संचिताप्रमाणे मिळालेले मी भोगीन. त्याचा भार पांडुरंगा, मी तुझ्यावर घालणार नाही. तुझ्या दर्षनासाठी कंठी प्राण धरून राहिलो आहे. मला दर्शन दे.’’
 
तुकाराम महाराजांजे पत्रातील ते अभंग वारकरी विठोबासमोर गाऊ लागले. ते ऐकून पांडुरंगाच्या डोळयातून पाणी वाहू लागले. नंतर विठोबा रुक्मिणीसह गरुडावर बसून तुकाराम महाराजांना भेटण्याकरीता देहूस गेले. महाराजांनी त्यांना पाहताच मोठ्या प्रेमाने दंडवत घातले.
 
पुढं रामेश्वर शास्त्री हयांचा सांगण्यानुसार आपले सर्व अभंग तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या डोहात स्वहस्ते बुडवून टाकले. तेव्हा त्यांच्या बरोबर बरेच लोक इंद्रायणीवर गेले. तुकाराम महाराजांनी अभंगाचे सारे बाड पाण्यात बुडविले. सर्व लोक पांडुरंगाचे ध्यान करीत तिथेच बसून राहिले. तेरा दिवसांनी ते सारे बाड पाण्यावर तरंगू लागले. ते बाड जसेच्या तसे कोरडेच होते. महाराजांना फार आनंद झाला. लोकांनी ते बाड पालखीत घालून दिंडीने मिरवित नेले.
 
पुढे तुकाराम महाराजांना नेण्यासाठी भगवान श्रीविष्णु विमान घेऊन आले. तुकाराम महाराज विमानात बसले. सदेह वैकुंठास गेले. तुकाराम महाराजांनी नंतर निळोबाच्या स्वप्नात जाऊन त्याला उपदेश केला. ते चिरंजीव आहेत. त्यांनी लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ हा मराठी भाषेतील अमर ज्ञानकोश आहे.