गोळवलकर गुरूजी, डाॅ. केशव बळीराम हेडगेवार

    
Total Views |

golavr_1  H x W 
 
गोळवलकर गुरूजी १९ फेब्रुवारी १९०६ - ०५ जुन १९७३
उत्तुंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा आणि संघटना कौशल्य असणारे, डाॅ. हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरूजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक विभूतीमत्व होते. बनारस हिंदु विद्यापीठातुन बी.एस्सी. व नंतर एम.एस्सी या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. ते प्राणी षास्त्राचे विद्यार्थि होते.
 
१९३३ मध्ये प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस विद्यापीठाने त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली. त्यावेळी डाॅ. हेडगेवार हे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. डाॅ. हेडगेवारांनी गुरूजींना पाहिले, जाणले व संघकार्यात त्यांना सहभागी करून घेतले.
 
१९३७ च्या मकर संक्रांतीच्या दिवषी अखंडानंदांनी गुरूजींना अनुग्रह दिला. डाॅ. हेडगेवार यांच्या नंतर ३३ वर्षे गुरूजीनी संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्याच काळात संघाचा प्रसार आणि प्रचार फार मोठया प्रमाणात झाला.
‘राष्ट्राय स्वाहा’ म्हणत गुरूजींचे संघकार्य राष्ट्रकार्य म्हणून अविरत सुरूच राहिले.
‘‘नमस्ते सदावत्सले मातृभूमे’’ हे शब्द सदा ओठांवर बाळगणाऱ्या गुरूजींना ०५ जून १९७३ या दिवशी देवाज्ञा झाली.
 
 
डाॅ. केशव बळीराम हेडगेवार ०१ एप्रिल १८८९ - २१ जून १९४०
डाॅक्टरांनी १९२५ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्वज्ञान व वेगळया प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाडयात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डाॅ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते.
भगवा ध्वज हाच गुरू अशी गुरूदक्षिणेची विलक्षण संकल्पना त्यांनी आचरणात आणली. विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूणवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा आदि कार्यपद्धती डाॅ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघामध्ये रूजवली.