किल्ले सिंधुदुर्ग

    
Total Views |
 
Sindhudurg_1  H
आरमाराच्या सहाय्याने समुद्रावर सत्ता गाजवीत कोकणपट्टीत धुमाकूळ घालणाऱ्या परदेशी सत्तांना उत्तर देण्यासाठी आरमार स्थापण्याची कल्पना महाराजांच्या मनात होतीच आणि मालवणच्या समोरील समुद्रातील ‘कुरटे’ नावाचे बेट त्याच्या भौगोलिक रचनेने महाराजांना एकदम पसंत पडले. तात्काळ या ठिकाणी नूतन ‘‘जंजिरा’’ म्हणजे जलदुर्ग वसविण्याचा निर्णय महाराजांनी घेतला आणि नाव ठेवले ‘सिंधुदुर्ग’.
 
पाण्यातील या शिवलंकेसाठी महाराजांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. आरमाराचे प्रत्येक अंग बळकट करण्यासाठी स्वराज्यस्थापनेच्या प्रचंड कार्याबरोबरच जाणीवपूर्वक पावले उचलली. सिद्दी, इंग्रज, आणि इतर जलचर राजवटींना पायबंद घालण्यात महाराज यशस्वी ठरले म्हणूनच त्यांना ‘भारतीय आरमाराचे जनक’ म्हणतात.
 
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत स्वराज्यातील इतर किल्ले औरंगजेबाच्या ताब्यात जात असतानासुद्धा सिंधुदुर्ग मात्र अजिंक्यच राहीला.