किल्ले रायगड

    
Total Views |

Raigad_1  H x W 
रायगड जिल्हयातील महाड हे महत्वाचे तालुक्याचे गाव आहे. महाडपासून रायगड २४ कि.मी. अंतरावर आहे. रायगडावर स्वतंत्र सिंहासन स्थापून विधीवत समारंभाने छात्रपतीपद धारण करून षिवरायांनी मराठयांच्या राज्याची श्रेष्ठता जगजाहीर केली. या राज्याभिशेकामूळे स्वराज्याची स्वतंत्र ओळख कायम झाली.
 
रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनाच्या स्थानाबरोबरच आहे छत्रपती शिवरायांची समाधी. अखंड महाराष्ट्राच्या मनातील पवित्राहून पवित्र असे हे तीर्थक्षेत्र रायगडावर आहे. राज्याभिषेकानंतर केलेल्या यशस्वी दक्षिण दिग्विजयानंतर दोन वर्षांनी छत्रपती शिवरायांचे रायगडावर ‘‘महानिर्वाण’’ झाले. मानवी देहाच्या, बुद्धीच्या आणि इच्छाशक्तिच्या सर्वोच्च क्षमतेचा अत्यंत योग्यप्रकारे वापर करून जगाच्या इतिहासात मराठयांचे नाव कायमचे सुवर्णाक्षरात कोरुन ठेवणाऱ्या छत्रपती श्री शिवरायांनी आपला देह रायगडावर ठेवला.