बाजीराव पेशवा

    

bajirao3_1  H x
 
 
हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपति शाहु महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावांचे पिता, वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती, म्हणूनच बाळाजी दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्या बरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी साम्राज्य किती पसरू शकते याचा अदमास त्या कोवळया वयातच बाजीने घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दैालतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. त्यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
 
बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता, म्हणनूच शाहू महाराज म्हणत, ‘मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.’ एवढा एकच उद्धार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो.